लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन ते चार तासात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

employees from bmc water distribution department get order of appointment for lok sabha election duty
‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
minister mangal prabhat lodha pay tribute to ramnath goenka
रामनाथ गोएंका यांना आदरांजली
election commission take help of 16 goodwill ambassador to increase voter turnout
Lok Sabha Elections 2024 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी १६ सदिच्छादूतांची मदत
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल

आणखी वाचा- Maharashtra Unseasonal Rain : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतपिकांचंही मोठं नुकसान

मुंबई, पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने केले आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, असेही सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा- मेट्रो-७च्या दिंडोशी स्थानकाच्या नामकरणाचा वाद: आनंदनगर स्थानकाचे नाव पूर्ववत, तर पठाणवाडीचे का नाही?

दरम्यान, मुंबईत आणि आसपासच्या परिसरात सोमवारी दुपारपासून वेगाने वारे वाहत असून ढगाळ वातावरण आहे. विजाही चमकत आहेत. मंगळवारी साजऱ्या होत असलेल्या धुलिवंदनावर अवकाळी पावसाचे सावट आहे.