राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं निधन

सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

krishna raj kapoor
कृष्णा राज कपूर

दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा यांच्या निधनाने कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे. राज कपूर यांनी १९४६ मध्ये कृष्णा यांच्याशी विवाह केला होता. कृष्णा यांच्या पश्चात रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर ही तीन मुलं तर रितू नंदा आणि रिमी जैन या दोन मुली असा परिवार आहे. करिना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत्या.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. ऑगस्टमध्ये त्यांना मुंबईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवस उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरून कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर, अभिनेत्री रविना टंडन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कृष्णा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.

https://www.instagram.com/p/BoX_SSjhfrN/

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj kapoor wife krishna raj kapoor passed away