राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. त्यादृष्टीने ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासभांमध्ये राजकीय नेत्यांकडून एकमेकांकडून टीका टीप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे, अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

“मी अनेकदा भूमिका बदलतो, अशी टीका माझ्यावर केली जाते. मात्र, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यात काहीही गैर नाही. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही. पण स्वत:च्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं याला भूमिका बदलणं म्हणतात. शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांनी बदललेल्या भूमिका बघून भूमिकाही लाजेल. त्यांचं अख्य आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त

“शरद पवार हे काँग्रेसच्या जीवावर आमदार आहे. पुढे मंत्रीही झाले. त्याच काँग्रेसचे आमदार फोडून ते जनसंघ आणि इतर पक्षांना घेऊन त्यांनी पुलोद स्थापन केली. इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर पुलोद बरखास्त करून केली. त्यानंतर सहा वर्ष बाहेर राहिले. १९८६ साली त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९८८ साली मुख्यमंत्री बनले. १९९१ ला संरक्षण मंत्री झाले.पुढे १९९९ मध्ये सोनिया गांधींना विदेशी बाई म्हणत काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर स्वतंत्र निवडणून लढवली आणि पुन्हा काँग्रेसबरोबर सत्तेत जाऊन बसले. याला भूमिका बदलणं म्हणतात”, असेही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!

रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनीही लक्ष्य केलं. “आपल्या कोकणात एक अणू उर्जा प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता. मग तो अणू उर्जा प्रकल्प गेला किंवा काम थंड झालं. हा प्रकल्प आला तर कोकणात भूकंप झाला, त्सुनामी आली तर किती हाहाकार होईल अशी टीका झाली होती. अणू उर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कल्पना नाही का? मुंबई हे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. या ठिकाणी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर उभं आहे. १९५९ किंवा १९६० ला ते बांधण्यात आलं आहे. त्यामध्ये न्यूक्लिअर रिअॅक्टर आहे. जर शहराच्या मध्यात ते आहे तर कोकणातला प्रकल्प बंद करायचा म्हणून कुठल्या उद्योगपतीने तुम्हाला सांगितलं होतं? कारण विरोध करतात तेव्हा कुठला तरी उद्योगपती मागे असतोच.” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Story img Loader