scorecardresearch

Good News… राज ठाकरे झाले आजोबा! अमित आणि मिताली यांना पुत्ररत्न प्राप्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले आहेत.

Raj-Thackeray-Son And Daughter in Law
मनसेच्या पदाधिकाऱ्याने फेसबुकवरुन दिली माहिती (फाइल फोटो)

सध्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे चर्चेत असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले आहेत. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्न प्राप्ती झालीय. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. मिताली या ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल होत्या. नातू झाल्याची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे ब्रीच कॅण्डी रुग्णालयाकडे रवाना झालेत.

सचिन मोरे यांनी फेसबुकवर “आमचे साहेब आजोबा झाले,” अशी पोस्ट केलीय. तसेच त्यांनी, “युवराजांचं आगमन” असं लिहित राज ठाकरेंना नातू झाल्याचंही म्हटलं आहे. सचिन यांनी अमित ठाकरेंचंही अभिनंदन केलंय.

काही आठवड्यांपूर्वीच राज यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली होती. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी काही आठवड्यांपासून सुरु होती. राज आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच बाळाच्या आजी शर्मिला ठाकरे हे या बातमीमुळे फार आनंदात आहेत. मिताली यांची प्रसुती एप्रिल महिन्यात होईल असंही या बातम्यामध्ये सांगण्यात आलेलं. मनसे पदाधिकाऱ्याने दुपारी दोनच्या सुमारास केलेल्या पोस्टमध्ये अमित आणि मिताली यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याचं म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> जाणून घ्या राज ठाकरेंच्या सूनबाईंबद्दलच्या काही खास गोष्टी

काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. याच नवीन घरामध्ये आता ही चिमुकली पावलं खेळताना बागडताना दिसणार आहेत.

अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.

२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात अमित आणि मिताली यांचा साखरपुडा पार पडला होता. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर दोघंही विवाहबंधनात अडकले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray son amit thackeray becomes father of son scsg

ताज्या बातम्या