मुंबईतील सायन रुग्णालयातील मराठी वाङ्‌मय मंडळाच्यावतीने आयोजित ‘वसंतोत्सवात’ आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय, सामाजिक विषयांसह विविध प्रश्नांची दिसखुलासपणे उत्तरं दिलं. तसेच यावेळी त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांना कुत्र चावल्याचा तो प्रसंगही सांगतिला.

हेही वाचा – “गेल्या १८ वर्षांपासून…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “बीकेसीतल्या सभेत मी..!”

Inspection of records in land records office by police in case of arrest of KDMC urban planning staff
कडोंमपा नगररचना कर्मचारी अटक प्रकरणात पोलिसांकडून भूमि अभिलेख कार्यालयातील अभिलेखांची तपासणी
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Sanjay Gaikwad hunted tiger
“मी वाघाची शिकार करून त्याचा दात…”, संजय गायकवाडांचा अजब दावा; म्हणाले, “बिबट्यांना मी सहज…”
pune e waste collection marathi news, salil kulkarni appealed people for e waste collection marathi news
पुण्यात रविवारी ४०० ठिकाणी होणार ई-कचरा गोळा; संगीतकार डाॅ. सलील कुलकर्णी यांनी केले पुणेकरांना ‘हे’ आवाहन

काय म्हणाले राज ठाकरे?

ते म्हणाले, “माझ्या आईला अजिबात कुत्री आवडत नाही. पण मला लहानपणापासून कुत्र्यांची आवड होती. खरं तर आमच्या घरात कुत्र्यांसाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या पत्नीला जातं. तिला कुत्र्यांचा लळा आहे. तिला काही वर्षांपूर्वी कुत्रा चावलाही होता. एकेदिवशी माझी पत्रकार परिषद होती. त्यावेळी अनेक पत्रकार हॉलमध्ये बसले होते. मी बाजुच्या रुममधून तयार होऊन पत्रकार परिषदेला जात होतो. तेवढ्यात ती तोंड धरून आली”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“एकीकडे पत्रकार परिषद अन्…”

पुढे बोलताना ते म्हणाले, “तिला विचारलं काय झालं, तर मला हाताने बाजुला हो म्हणत ती बाथरुममध्ये गेली. मी खाली बघितलं तर सगळीकडे रक्ताचे दाग दिसत होते. मी तिच्याकडे बघितलं तर तिच्या ओठांचे पाच तुकडे झाले होते आणि जबड्याचं हाडही बाहेर आलं होतं. एकीकडे पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार घरात बसले होते आणि दुसरीकडे अशी घटना घडली, काय करावं मलाच सुचत नव्हतं. त्यावेळी नितीन सरदेसाई यांनी बाहेरुन तिला दवाखान्यात नेलं आणि वेळीच उपचार झाले.”

हेही वाचा – राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या माहीममधील कबरीवरून भाजपाचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र; म्हणाले,“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे…”

“…म्हणून त्याने चावा घेतला असावा”

यावर बोलताना त्यांनी मिश्किल टीप्पणीही केली. “खरं तर माझ्या पत्नीला पायऱ्यावरून खाली उतरताना कुत्र्यांचा लाड करायची सवय होती. कदाचित त्यावेळी तो झोपला असावा आणि चांगलं स्वप्न बघत असावा, अशात तिने उठवल्याने त्याने रागात चावा घेतला असावा, असे ते म्हणाले. तसेच रुग्णालयातून परत आल्यानंतर ती आधी कुत्र्याला भेटून मग घरात गेली”, असंही त्यांनी सांगितलं.