मनसेचे टोलविरोधी आंदोलन सुरू असून मंगळवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी वांद्रे वरळी सागरी सेतूवर आंदोलन केले. पोलिसांचा बंदोबस्त असूनही मनसे कार्यकर्त्यांनी घुडगूस घातला. याप्रकरणी १६ मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल विरोधी आंदोलन पुकारले असून त्याचे पडसाद राज्याच्या विविध टोल नाक्यावर पडत आहे. रविवार रात्री पासून राज्यातील २० टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. वांद्रे वरळी सागरी सेतूवर मंगळवारी दुपारी कॅप्टन मलिक यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी जमू लागले होते. पोलिसांनीही आपला बंदोबस्त वाढवला होता. परंतु पोलिसांना न जुमानता कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर धुडगूस घातला.  पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी १६ जणांना अटक केली.राज ठाकरे यांचे वक्तव्य तपासून पहात आहोत असे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी स्पष्ट केले.
राज यांचे आता टोल ‘फोड’ के बोल!
मनसे आणि टोल..
टोल रद्द करता येणार नाही – अजित पवार