मुंबई : मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी राकेश कलासागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद अवनत करून उपमहानिरीक्षक दर्जाचे करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील १२ अधिकाऱ्यांना उपमहानिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली असून एकूण २६ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश शुक्रवारी गृहविभागाने जारी केले. त्यात अपर पोलीस आयुक्त (विशेष शाखा) धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस आयुक्त (वाहतूक,मुंबई) पदी प्रियंका नारनवरे, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग,मुंबई) विक्रम देशमाने व अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग,मुंबई) शशिकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे.

गृहविभागाने राज्यभरातील १२ उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली केली. त्यात अनिल पारसकर यांची अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा, मुंबई), शैलेश बलकवडे यांची अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे, मुंबई), एम. रामकुमार यांची (महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे), प्रविण पाटील यांची अपर पोलीस आयुक्त (नागपूर शहर), संजय बी. पाटील यांची अपर पोलीस आयुक्त (पुणे शहर), वसंत परदेशी यांची अपर पोलीस आयुक्त (नागपूर शहर), एस.डी. आव्हाड यांची अपर पोलीस आयुक्त (पिंपरी चिंचवड), एस. टी. राठोड यांची पोलीस उप महानिरीक्षक (अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स), पी.पी. शेवाळे पोलीस उप महानिरीक्षक( दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), ए.एच. चावरिया पोलीस आयुक्त (अमरावती शहर) व विनिता साहु अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा, मुंबई) या पदावर बदली करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील १४ पोलीस अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरिक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांना नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यात प्रसाद अक्कानवरू यांची पोलीस उपमहानिरीक्षक(महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, मुंबई), पंकज देशमुख यांची अपर पोलीस आयुक्त(पुणे शहर), अमोघ गावकर यांची पोलीस उपमहानिरीक्षक(राज्य गुन्हे अन्वेषण प्रशासन, पुणे), जी श्रीधर यांची पोलीस उपमहानिरीक्षक(पोलीस दळणवळ, पुणे), मोक्षदा पाटील यांची पोलीस उपमहानिरीक्षक(राज्य राखीव पोली बल, मुंबई), अरविंद साळवे यांची सहसंचालक(महाराष्ट्र पोलीस अकादमी,नाशिक), सुरेशकुमार मेंगडे यांची मुख्य दक्षता अधिकारी (सिडको,नवी मुंबई), विजय मगर यांची पोलीस उपमहानिरीक्षक (राज्य राखीव पोलीस बल, पुणे), राजेश बनसोडे यांची अपर पोलीस आयुक्त(पुणे शहर) व राजेंद्र दाभाडे यांची अपर पोलीस आयुक्त(नागपूर शहर) या पदावर बदली करण्यात आली आहे.