अभिनेत्री रकुल प्रीत राहत असलेल्या इमारतीला आग, संपूर्ण मजला जळून खाक

यावेळी इमारतीच्या तो संपूर्ण मजला जळून खाक झाला.

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह राहत असलेल्या इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. रकुल प्रीत राहत असलेल्या इमारतीमधील १२ व्या मजल्यावर आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाल्या आहेत. दरम्यान या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास रकुल प्रीत राहत असलेल्या इमारतीला आग लागली. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर लागलेली ही आग फारच भयानक होती. यावेळी इमारतीच्या तो संपूर्ण मजला जळून खाक झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. सुदैवाने या आगीत रकुल प्रीतच्या घराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र ही आग नेमकी का लागली, कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक म्हणून रकुल प्रीत सिंहला ओळखले जाते. रकुलने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती बॉलिवूडमध्ये सक्रिय असून तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. ‘छत्रीवाली’ या चित्रपटाचे लखनऊ येथे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात ती एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakul preet singh building fire breaks out at 12th floor no casualties nrp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या