scorecardresearch

Video : असा केला २६/११ दहशतवादी हल्ल्याचा तपास; रमेश महालेंनी सांगितला घटनाक्रम

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेला हल्ला हा भारतावर झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे.

Ramesh Mahale
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण तपास रमेश महाले यांनी केला होता.

स्वातंत्र्यानंतर भारतावर अनेक मोठे दहशतवादी हल्ले झाले. मुंबईवर झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला हा याच मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादी यांच्यात जवळपास ६० तास ही झुंज चालली. फ़िदायिन हल्लेखोराला जिवंत पकडणे हे मुंबई पोलिसांचं मोठं यश असून अशा हल्लेखोराला पकडणे ही जगातील पहिली घटना होती असं या हल्ल्याचा तपास करणारे अधिकारी रमेश महाले यांनी म्हटलंय. या हल्ल्याचा तपास करताना आलेला अनुभव तपास अधिकारी रमेश महाले यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितला.

२६/११च्या या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोकांना आपला प्राण गमवावा लागला तर ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. यात अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश होता. मुंबईवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांचे सर्वच भागातून कौतुक देखील करण्यात आले. या हल्ल्यात जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला अखेरीस २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2021 at 12:05 IST

संबंधित बातम्या