राणा कपूर यांच्या कुटुंबीयांना न्यायालयाकडूनही तातडीचा दिलासा नाही

न्यायालयाने जामीन न देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी आणि मुलींना उच्च न्यायालयानेही सोमवारी तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. विशेष न्यायालयाने शनिवारी या तिघींना जामीन देण्यास नकार देत त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यामुळे सध्या त्या भायखळा महिला कारागृहात आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने न्यायालयाला सांगण्यात आल्यावर न्यायालयाने तिघींच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

या तिघींनी विशेष न्यायालयाने जामीन न देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कपूर यांची पत्नी बिंदू आणि मुली राधा कपूर व आणि रोशनी खन्ना यांच्या बेकायदा कृतीमुळे बँकेला चार हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना महिला आणि लहान मुलांची आई असल्याने सहानुभूती दाखवण्याचा प्रश्नच येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. मात्र न्यायालयाने चुकीची निरीक्षण नोंदवल्याचा दावा करत विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी तिघींनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणी गोळा केलेले सगळे पुरावे सीबीआयच्या ताब्यात असून ते नष्ट करण्याचा प्रश्न नाही. शिवाय त्यांचा आर्थिक गैरव्यवहारामध्ये किंवा बँकेच्या दैनंदिन व्यवहारात काहीही सहभाग नसल्याचा दावाही त्यांनी केला आह

त्यांची याचिका न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सादर करण्यात आली. तसेच त्यावर तातडीने सुनावणीची मागणी केली गेली. परंतु न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. 

या प्रकरणी तिघींना अटक करण्यात आलेली नव्हती. त्यामुऴे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने तिघींनी सहानुभूती म्हणून जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती.        

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rana kapoor family has not received any immediate relief from the court akp