दिशा सालियन मृत्यू प्रकरण

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची मृत्यू पश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली.

ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी

दिंडोशी न्यायालयाने दोघांनाही अटकेपासून दिलासा दिल्यानंतर राणे पितापुत्र जबाब नोंदवण्यासाठी मालवणी पोलिसांसमोर हजर झाले होते. आता दोघांनी दिशाची आई वासंती यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड्. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यात त्यांनी दिशाच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. तसेच सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर करताना पुन्हा गुन्हा केल्यास जामीन रद्द करण्याची अट घातली होती. हा जामीन रद्द करण्यासाठीच आपल्यावर दिशाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.

राणे यांनी १९ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नितेश राणेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत दोघांनी दिशाच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले. त्यानंतर दिशाची आई वासंती यांनी तक्रार नोंदवली होती. 

पुरावे देत नसल्याचा पोलिसांचा आरोप

दिशाच्या मृत्यूबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा राणे पितापुत्र करत असले तरी तो सुपूर्द करण्यास त्यांनी नकार दिला आहे. दिशाच्या मृत्यूचा तपास सुरू असतानाही त्याबाबतचा पुरावा दोघांनी कोणत्याही तपास यंत्रणेकडे सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे हा पुरावा काय आहे हे शोधण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी राणे पितापुत्राच्या अटकपूर्व जामिनाला प्रतिज्ञापत्रा्द्वारे विरोध करताना म्हटले आहे. दिशाच्या मृत्युचे राणे पितापुत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत. त्यामुळे ते कशाच्या आधारे आरोप करत आहेत. तसेच पुराव्यांविना ते दिशाची बदनामी करत असतील तर त्यामागील हेतू शोधणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.