गुढीपाडव्याच्या दिवशी राणीची बाग पर्यटकांसाठी खुली, राणीची बाग बुधवारऐवजी गुरुवारी बंद राहणार

महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी राणीची बाग जनतेसाठी खुली असते.

Rani Chi Bagh will be open for tourists on Gudi Padva day
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त बुधवार, २२ मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. या आठवड्यात राणीची बाग बुधवारऐवजी गुरुवारी बंद राहणार आहे. भायखळा येथील राणीची बाग दर बुधवारी बंद असते. मात्र यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी राणीची बाग जनतेसाठी खुली असते. राणीची बाग बुधवारी खुली असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ती बंद ठेवण्यात येते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

राणीच्या बागेतील तिकीट खिडकी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० दरम्यान सुरू असते. राणीची बाग सायंकाळी ६.०० वाजता बंद होते. राणीच्या बागेतील प्रवेशासाठी प्रतीव्यक्ती ५० रुपये शुल्क असून वय वर्ष ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी २५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. आई – वडिल आणि १५ वर्षे वयापर्यंतची दोन मुले अशा चार व्यक्तींच्या कुटुंबासाठी १०० रुपये एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:59 IST
Next Story
Mumbai Lalbaug Crime : “मी आईची हत्या केली नाही, तिच्या मृतदेहाचे…” मुलीचं न्यायालयात वक्तव्य
Exit mobile version