scorecardresearch

दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा अटकेत

अंधेरी येथे राहणाऱ्या दोन आठ वर्षांच्या मुली आपल्या इमारतीजवळ खेळत होत्या.

Rape a young lady in pune, Woman allegedly raped in Pune,rape, बलात्काराचा प्रयत्न,
प्रातिनिधीक छायाचित्र

अंधेरी येथे आपल्या घराबाहेर खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेट आणि आईस्क्रीमचे आमीष दाखवून त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या ४० वर्षीय इसमास आंबोली पोलिसांनी अटक केली. या इसमाने यापूर्वीही एका लहान मुलीवर लैगीक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

अंधेरी येथे राहणाऱ्या दोन आठ वर्षांच्या मुली आपल्या इमारतीजवळ खेळत होत्या. त्यावेळी शहजाद अन्सारी (४०) हा तेथे आला आणि त्याने या दोघींना चॉकलेट व आईस्क्रीम देण्याचे आमीष दाखविले. दुकानात नेण्याच्या बहाण्याने त्याने या दोघींना जवळच्या इमारतीत नेले आणि दोघींवर बलात्कार केला. घडला प्रकार कुणालाही सांगू नका असा दमही त्याने या दोघींना दिला. या दोघींनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-11-2015 at 06:35 IST