मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत दुर्मीळ वन्यजीव सापडले असून विभागाने या प्राण्यांची सुटका केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी प्रवाशाला अटक केली आहे. तो आंतरराष्ट्रीय टोळीशी संंबंधीत असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मुंबई विमानतळावर बँकॉक येथून आलेल्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यामुळे सीमाशुल्क विभागाने त्याला अडवले. चौकशीत प्रवासी घाबरलेला व अस्वस्थ दिसून आल्यामुळे अधिक तपास करण्यात आला. त्यावेळी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात दुर्मीळ आणि संरक्षित वन्यजीव सापडले आहे. सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे एक चाको गोल्डन नी टरंट्युला, एक ब्रान्चपेल्मा टरंट्युला, ८० इग्वाना, सहा ल्युसिस्टिक शुगर ग्लायडर, एक फायर टेल्ड सनबर्ड, एक पर्पल थ्रोटेड सनबर्ड, दोन क्रेस्टेड फिंचबिल, एक हनी बेअर, दोन ब्राझिलियन चेरी हेड कासवे सापडली. त्यातील ३० इग्वाना, एक पर्पल थ्रोटेड सनबर्ड व एका फायर टेल्ड सनबर्डचा यांचा समावेश आहे. याबाबत सीमाशुल्क विभागाने पंचनामा केल्यानंतर सर्व प्राणी ताब्यात घेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने त्यांची देखभाल सुरू आहे. सर्व प्राण्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याप्रकरणी आरोपी प्रवाशाविरुद्ध सीमा शुल्क कायदा, १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या तस्करी मागे आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करांच्या टोळीचा संबंध असल्याचा संशय आहे. त्याबाबत आरोपी प्रवाशाची चौकशी करण्यात आली.