जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ, भाजपकडून कारवाईची मागणी

जालना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी शनिवारी केले. त्यावरून गदारोळ सुरू झाला असून या वक्तव्यावरून भाजपने अख्तर यांना लक्ष्य करीत माफीची मागणी के ली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका विधानावर त्यांना अटक केली जाते. मात्र कुणी कोथळा बाहेर काढण्याची भाषा करते, दुसरीकडे कुणीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करते. या साऱ्यांवर मुख्यमंत्री काहीही कारवाई करत नाहीत. आता यापुढे आमच्या वाटेला जाल तर आम्हीही सोडणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेत्यांसह ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना इशारा दिला आहे.

पाटील येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी केलेली तुलना ही अत्यंत निषेधार्ह आहे. याचा अर्थ त्यांना ‘हिंदू’ शब्दाचा अर्थ कळलेला नाही, हे दर्शवते. हिंदू ही पूजा पद्धती नाही. या देशामध्ये पाच हजार वर्षांचा हिंदूंचा इतिहास असून हिंदूंनी कधी अन्य धर्मीयांच्या धर्मस्थळावर हल्लाच केला नाही. उलट येणाऱ्यांना धर्मस्थळे बांधून दिली. त्यामुळे सर्वधर्मसमभाव या शब्दाला हिंदू हा समकक्ष शब्द आहे. त्यामुळे तालिबान्यांशी तुलना करणे याचा अर्थ जावेद अख्तर यांना ‘हिंदू’ शब्दच कळला नाही.

दरम्यान, अजित पवार यांच्या पुन्हा टाळेबंदी लागू करण्याच्या विधानाचाही पाटील यांनी समाचार घेतला. नियमांचे पालन करत जनजीवन सुरूच ठेवावे लागणार आहे. स्वत: सर्व सोयीसुविधा घेणारे लोकांना सतत असे डांबून ठेवत असल्याची टीका त्यांनी केली.

भाजपचा इशारा

भाजपने अख्तर यांना लक्ष्य करीत माफीची मागणी के ली आहे. जावेद अख्तर यांनी माफी मागून ते विधान मागे न घेतल्यास बदनामीबद्दल खटला दाखल करण्याचा इशारा मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.  जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. आरएसएस, विश्वा हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांना समर्थन देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

वैद्यनाथ बँक प्रकरणाबाबत माहिती घेतो

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ बँकेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शंभू महादेव साखर कारखान्याच्या कथित ४६ कोटींच्या साखर घोटए-ए-ाळ्याचे हे प्रकरण असून त्याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, मला या प्रकरणाबाबत काही माहिती नाही. तपास यंत्रणेवर बोलणे बरोबर नाही. माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले.