मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडून निवडीची औपचारिक घोषणा मंगळवारी केली जाणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया झाली. केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, अतुल सावे आदींच्या उपस्थितीत चव्हाण यांनी प्रदेश कार्यालयात निवडणूक अर्ज दाखल केला. चव्हाण यांचा पदग्रहण समारंभ मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात होणार आहे.

चव्हाण यांनी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, चार वेळा आमदार, भाजप प्रदेश प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री, युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, चार वेळा आमदार, राज्यमंत्री व मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या चव्हाण यांनी सांभाळल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप कोकणात पक्षविस्तार करणार

चव्हाण हे कोकणातील असून भाजप कोकणात पक्षविस्तारावर लक्ष केंद्रीत करणार आहे. महायुतीमध्ये असल्याने निवडणुकीमध्ये कोकणात काही जागांवर मर्यादा येतात. पण पक्षवाढीसाठी कोणतीही अडचण नसून कोकणात सर्वत्र भाजप पक्ष वाढविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.