बांधकामाच्या आड येणारी ६९ झाडे काढणार
मुंबई : दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन टिळक पुलाची पुनर्बाधणी करण्यात येणार असून या कामाकरिता ६९ झाडे काढावी लागणार आहेत. त्यापैकी ४७ झाडे कापावी लागणार असून २२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.
अंधेरीच्या गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या सर्वच पुलांची आयआयटीमार्फत संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. त्यात काही पुलांची संरचनात्मक दुरुस्ती तर काही पुलांची पुनर्बाधणी सुचवण्यात आली होती. त्यानुसार रेल्वेवरील ११ पुलांच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एमआरआयडीसी) प्राधिकरणामार्फत ही पुनर्बाधणी के ली जाणार आहे. यामध्ये प्राधान्याने सहा रेल्वे रुळांवरील पुलांचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत टिळक पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पुनर्बाधणीच्या कामासाठी बांधकामाच्या आड येणारी ६९ झाडे काढावी लागणार आहेत. तसा प्रस्ताव एमआरआयडीसीतर्फे वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. या पुलाच्या ठिकाणी एकू ण ९४ वृक्ष असून त्यापैकी २२ झाडे पुनर्रोपित करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.
दरम्यान, पालिके च्या उद्यान विभागाने झाडे काढण्यासंदर्भात नागरिकांचे काही आक्षेप असल्यास ते मागवले आहेत. नागरिकांना १३ ऑगस्टपर्यंत उद्यान अधीक्षकांना मेलने पाठवावेत, असे आवाहन उद्यान अधीक्षकांनी के ले आहे. नागरिकांच्या आक्षेपांवर सुनावणी पार पडल्यानंतर, पाहणी करून मग प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीकरिता पाठवण्यात येणार आहे.
टिळक पुलाची नवी रचना ही ‘के बल स्टे’ स्वरूपाची असेल. या पुलाचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.