सीएसएमटीच्या धर्तीवर सुविधांसाठी ‘आयआरएसडीसी’ सल्लागाराची नियुक्ती करणार

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळाने (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉपर्ोेशन-आयआरएसडीसी) घेतला आहे. या स्थानकाच्या हद्दीत सीएसएमटी स्थानकाप्रमाणेच सोयी-सुविधांची भर पडेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
kalyan railway station crime news,
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले

गेल्या काही वर्षांत पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील बोरिवली स्थानकातील प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. सध्या करोनाकाळात या स्थानकाची दररोजची प्रवासी संख्या पावणेदोन लाख असली तरीही २०१७ व १८ मध्ये प्रवासी संख्या दोन लाख ९३ हजार होती, ती वाढून तीन लाखांहून अधिक झाली होती. उपनगरात घर घेण्याकडे वाढलेला कल आणि रस्ते प्रवास करताना होणारी वाहतूक कोंडी यामुळे अनेक जण लोकलचाच पर्याय निवडतात. त्यामुळेच प्रवासी संख्या वाढतच आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 गेल्या काही वर्षांत वाढत जाणारी प्रवासी संख्या पाहता बोरिवली स्थानकात प्रवासी सुविधांचीही भर पडली. यात फलाट, पादचारी पूल, सरकते जिने, उद्वाहक इत्यादी सुविधांत वाढ झाली. बोरिवली स्थानकात दहा फलाट असून पाच पादचारी पूल, सात सरकते जिने, सात उद्वाहक आहेत. आणखी तीन सरकत्या जिन्यांचीही भर पडणार आहे. सध्या असलेल्या पादचारी पुलांना स्कायवॉकचीही जोड दिली आहे. तसेच पश्चिमेला प्रवाशांना स्थानकापर्यंत येण्यासाठी डेकही उपलब्ध केला आहे.

या स्थानकाच्या पश्चिम आणि पूर्वेला असलेल्या रेल्वे हद्दीचा आणखी काही विकास करता येतो का याची चाचपणी आयआरएसडीसीकडून केली जाणार आहे. सीएसएमटी स्थानक हद्दीच्या पुनर्विकासासारखेच बोरिवली स्थानकाचा विकास करण्याचा विचार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाईल, अशी माहिती देण्यात आली. वाहनतळ, स्थानक अपंगस्नेही करणे, आगमन व निर्गमनचे वेगवेगळे भाग करणे, रेल मॉल इत्यादी सुविधा देण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

कल्याणचाही प्रस्ताव

सीएसएमटी स्थानक पुनर्विकासाला गती देतानाच कल्याण स्थानकाचाही आराखडा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तसेच लवकरच कंपन्यांसाठी रुची प्रस्ताव काढला जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.