मुंबई: नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना एकापेक्षा अधिक उपचारपद्धतींमध्ये (पॅथी) सेवा देता येणार नाही. कोणत्याही एकाच पॅथीमध्ये सेवा देण्याची परवानगी असेल, असे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) जाहीर केलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नियमन २०२२ च्या मसुद्यामध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयुर्वेद ,होमिओपॅथीचे शिक्षण घेऊन आधुनिक उपाचर पद्धती (अ‍ॅलोपॅथी) अवलंबण्यास डॉक्टरांवर मर्यादा येणार आहेत.

नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवेचे नियमन करण्यासाठी हा मसुदा तयार करण्यात आला आहे. वैद्यकीय व्यावसायिकाने एकापेक्षा अधिक पॅथीमध्ये शिक्षण घेतले तरी त्याला सेवा देण्यासाठी एकाच पॅथीची निवड करावी लागेल. एनएमसी कायद्याअंतर्गत व्यावसायिकाने आधुनिक किंवा अलोपॅथीमध्ये सेवा देण्यासाठी नोंदणी केल्यास त्या व्यक्तीला अन्य पॅथीमध्ये एकाच वेळेस सेवा देता येणार नाही. लघु अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दुसऱ्या पॅथीचे शिक्षण घेतलेले डॉक्टर्स अन्य पॅथीमध्ये सेवा देण्यासाठी पात्र नसतील, असेही या मसुद्यामध्ये नमूद केले आहे. हा मसुदा सूचना आणि हरकतींसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या आयुर्वेदामध्ये पदवीचे शिक्षण घेतेलेले अनेक डॉक्टर अ‍ॅलोपॅथीमध्ये सेवा देत आहेत. राज्य सरकारने त्यासाठी स्वतंत्र लघु अभ्यासक्रमही तयार केला असून हा उत्तीर्ण करणाऱ्यांना अलोपॅथी सेवा देण्याची परवानगी दिलेली आहे. हे डॉक्टर एकाच वेळी आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथीची सेवा देखील देत आहेत.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

एनएमसीच्या या नव्या मसुद्यानुसार आता यावर बंधने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नव्या मसुद्याबाबत अनेक आक्षेप घेतले जात आहेत.  एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळय़ा पॅथीमध्ये शिक्षण घेण्याची मुभा दिलेली आहे. मग डॉक्टरांना दोन पॅथीमध्ये सेवा देण्यास का नाकारले जात आहे. याचा अर्थ शिक्षण अभ्यासक्रमामध्येही त्रुटी आहे. अनेकदा रुग्णांना दोन पॅथींचा फायदा होतो. डॉक्टरांनाही दोन्ही पॅथीचे ज्ञान असल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मसुद्यातील या अटीबाबत पुनर्विचार होणे आवश्यक आहे, असे मत फिजिशियन डॉ. दीपक बैद यांनी व्यक्त केले.

समाजमाध्यमांच्या वापरावरही नियंत्रण

रुग्णांना आकर्षित करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समाजमाध्यमांचा वापर करणे अनैतिक असल्याचे या मसुद्यामध्ये म्हटले आहे. लाईक्स, फॉलोअर्स वाढवून विविध अ‍ॅपमध्ये आपले नाव वरच्या स्थानावर येण्यासाठी पैसे देणे हे ही नियमबाह्य आहे. समाजमाध्यमे आणि टेलिमेडिसीन यामध्ये फरक असून याचा वापर योग्यरितीने डॉक्टरांनी करम्णे गरजेचे आहे. सार्वजनिक समाजमाध्यमांद्वारे उपचार करणे किंवा औषधे सांगणे डॉक्टरांनी टाळावे. यासाठी टेलिमेडिसीनचा वापर करावा, असे मसुद्यामध्ये नमूद केले आहे.