पिंपरी-चिंचवड येथे १५ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रतिनिधी नोदणीस सुरुवात झाली आहे. तसेच संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शनातील पुस्तक विक्रीच्या गाळ्यांसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे.
१५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजल्यापासून १८ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत निवासाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. निवास आणि भोजनाचे शुल्क प्रत्येकी दोन हजार रुपये आहे. संमेलन काळात स्वत:ची निवास व्यवस्था करणाऱ्या प्रतिनिधींना बाराशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या व्यवस्थेत सकाळी चहा, नाष्टा तसेच दोन वेळच्या भोजनाचा समावेश आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर अशी आहे. पुस्तक प्रदर्शनाच्या गाळ्यासाठी नावनोंदणी व प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर असून गाळ्यांची सोडत ४ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी साहित्य संमेलन कार्यालय, ८ वा मजला, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, संत तुकाराम नगर, िपपरी, पुणे ४११०१८ येथे किंवा ०२०- २७४२१०९५, ९८५०३ ०५९९५ या दूरध्वनी क्रमांकांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.<http://www.sahitysammelan.dpu.edu.in/> या संकेतस्थळावरही अधिक माहिती उपलब्ध आहे. संमेलन प्रतिनिधी किंवा पुस्तक गाळ्यासाठीचे अर्ज संकेतस्थळावरूनही डाऊनलोड करून घेता येणार आहेत.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!