मुंबई : पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीररीत्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे, त्याची तातडीने सुटका करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी मुलाच्या आत्याने शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मात्र या मुलाची तातडीने सुटका करण्याबाबतचा दिलासा देण्यास नकार दिला. तसेच, प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली,

या अल्पवयीन आरोपीची सुरूवातीला जामिनावर सुटका करण्यात आली होती. परंतु, त्याबाबत चहूबाजूंनी झालेल्या टीकेनंतर या मुलाला आजोबांच्या ताब्यातून घेऊन पुन्हा एकदा बाल न्यायमंडळासमोर उपस्थित करण्यात आले. त्यानंतर, त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. मात्र, या मुलाला बेकायदेशीररीत्या आणि मनमानी पद्धतीने पुन्हा कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे, न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालून मुलाची तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी अल्पवयीन आरोपीची आत्या पूजा जैन हिने याचिकेद्वारे केली आहे. बाल न्याय मंडळाचा मुलाला सुधारगृहात पाठवण्याचा निर्णय रद्द करण्याची मुख्य मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
Video viral of elderly man denied entry at mall for wearing dhoti in Bangalore
धोतर नेसलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
female ias officers in maharashtra ias officer sujata saunik controversial ias officer pooja khedkar
उथळ अधिकाऱ्यांचा पर्दाफाश!

हेही वाचा >>>स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये वाढ; पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट

न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर जैन हिची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, बाल न्याय कायद्यानुसार, अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाणे किंवा सुधारगृहात ठेवले जाऊ शकत नाही. किंबहुना, त्याला सराईत गुन्हेगार होण्यापासून संरक्षित करण्याचे कायदा सांगतो. त्यामुळे, याचिका निकाली निघेपर्यंत प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची तात्पुरती सुटका करण्याची मागणी याचिकाकर्तीतर्फे वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांनी केला. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी त्याला विरोध केला. तसेच, मुलाला आवश्यक कायदेशीर प्रक्रियेनंतरच पुन्हा एकदा ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठवण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेही याचिकाकर्तीला तातडीने दिलासा देण्यास नकार देऊन प्रकरणाची सुनावणी गुरूवारी ठेवली.

हेही वाचा >>>कर्करुग्णांना दिलासा:  रेडिओथेरपीचे दुष्परिणाम कमी करणारे औषध उपलब्ध

दरम्यान, मुलाला पुन्हा ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठवण्याबाबत तपास यंत्रणेने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआपीसी) कलम ४३९ (२) अन्वये अर्ज करणे अपेक्षित होते. मात्र, तपास यंत्रणेने नियमानुसार अर्ज केला नव्हता किंवा मुलाला ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठवण्याची मागणीही केली नव्हती. त्यामुळे, तपास यंत्रणेचा अर्ज कायदेशीर चौकटीत बसणारा नाही, असा दावा याचिकाकर्तीने केला आहे.

न्यायाचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक

या प्रकरणाबाबत सार्वजनिक पातळीवर उपलब्ध माहितीचा विचार केल्यास अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या कुटुंबालाच लक्ष्य केले जात नाही, तर न्यायिक अधिकारी आणि न्यायपालिकेची देखील अत्यंत अवमानकारक पद्धतीने थट्टा केली जात आहे. सुदैवाने, आतापर्यंत न्यायिक अधिकाऱ्याच्या सचोटीबद्दल कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश देखील माध्यमांतर्फे या प्रकरणाबाबत दिल्या जाणाऱ्या बातम्यांच्या दबावाला बळी पडल्यासारखे वाटत आहेत, असा दावा देखील जैन हिने याचिकेद्वारे केला आहे. तसेच, न्यायाचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.