‘रिलायन्स जिओ’कडून फोर जी सेवा सुरू

रिलायन्स समूहातील दूरसंचार कंपनी ‘रिलायन्स जिओ’ने आपल्या एक लाख कर्मचाऱ्यांसाठी ‘फोर जी’ सेवा सुरू केली.

रिलायन्स समूहातील दूरसंचार कंपनी ‘रिलायन्स जिओ’ने आपल्या एक लाख कर्मचाऱ्यांसाठी ‘फोर जी’ सेवा सुरू केली. समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या ८३व्या जन्मतिथीचे निमित्त साधून ‘जिओ’ या ब्रँडनेमखाली सुरू केलेल्या या सेवेचा नंतर इतरही मोबाईलधारकांपर्यंत विस्तार केला जाईल. सध्या कर्मचाऱ्यांना ही सेवा मोफत पुरविली जाणार आहे. नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाला रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी कुटुंबासह ‘ जिओ’चा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर अभिनेता शाहरूख खान व संगीतकार ए. आर. रहमानदेखील उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reliance 4g start

ताज्या बातम्या