ओरिगामीच्या कलेद्वारे मुलांच्या कल्पकतेला धुमारे!

लोकसत्ता’च्या ‘मधली सुट्टी’ या उपक्रमात गुरूवारी श्रीराम पत्की यांनी ओरिगामीचे गंमतीशीर विश्व वेब गप्पांमधून मुलांसमोर उभे केले.

या उपक्रमाचे सहप्रायोजक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, मर्यादित आहेत

‘मधली सुट्टी’मधील सत्रात श्रीराम पत्की यांचे प्रतिपादन

मुंबई : रंगीबेरंगी चौकोनी कागद घेऊन तो कु ठेही न कापता त्याच्या घड्या घालायच्या आणि त्यापासून आपल्याला हवे ते प्राणी, पक्षी, मासे, फु ले, असे आकार घडवायचे. ओरिगामी या नावाने ओळखली जाणारी ही घडीबाजीची कला शिकणे किती सहजशक्य आहे हे प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्याचा आनंद बालदोस्तांनी ओरिगामीच्या खास सत्रातून घेतला. ‘लोकसत्ता’च्या ‘मधली सुट्टी’ या उपक्रमात गुरूवारी श्रीराम पत्की यांनी ओरिगामीचे गंमतीशीर विश्व वेब गप्पांमधून मुलांसमोर उभे केले.

पत्की यांनी ओरिगामी कलेचे मूळ आणि कूळ सोप्या शब्दांत उलगडले. ते म्हणाले, ‘‘ओरि म्हणजे घड्या आणि गामी म्हणजे कागद. कागदी घड्यांमधून कलाकृती घडवण्याची ही कला जपानमधून आज सर्वदूर पसरली आहे. चीनमधील बौध्द भिक्षू कागद घेऊन जपानमध्ये पोहोचले. तेव्हापासून या कागदी कलेचा उगम जपानमध्ये झाला. चीनमध्ये ओरिगामीला ‘झेझी’ नावाने संबोधले जाते.’’

सोप्या कृतींमधून त्यांनी वेबसत्रात मुलांकडून ओरिगामी करून घेतली. ओरिगामी शिकायची तर आधी घडीची भाषा शिकू न घ्यावी लागते, असे सांगत चौकोनी कागदाच्या घड्या घालून त्रिकोणी, चौकोनी असे भौमितिक आकार तयार करणे आणि त्याच्या पुन्हा कल्पकतेने घड्या घालणे, हे त्यांनी प्रात्यक्षिकात करून दाखवले. होडी, त्याच होडीच्या पुन्हा दोन घड्या घालून तयार होणारे जहाज, असा वेगवेगळे आकार निर्माण करण्याचा खेळ त्यांनी रंगवला.

मुलांना घडी जमते आहे ना, इथपासून ते त्यांच्या शंका पत्की यांच्यापर्यंत पोहोचवत दोघांमधील संवादाचे सूत्र  ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी स्वाती पंडित यांनी सांभाळले. दोन ते तीन घड्यांमध्ये तयार झालेला कु त्रा, वरवर अंमळ किचकट वाटणाऱ्या घड्यांमधून सहज तयार झालेले हुबेहुब फु लपाखरू घडवताना मुले हरखून गेली. ओरिगामीमधील ‘वॉटरबॉम्ब’ म्हणजेच फु ग्याची घडी या अगदी प्राथमिक घडीपासून श्रीराम पत्की यांनी मुलांना आकार तयार करून दाखवले.

‘‘ओरिगामीमध्ये स्वत:च्या कौशल्याने नवीन कलाकृती घडवण्याचा शोध घेतला जातो. हे आकार घडवताना मुलांची निरीक्षणशक्ती वाढते. आपण पाहिलेली गोष्ट कागदातून हुबेहूब साकारताना कल्पनाशक्तीचा कस लागतो. ओरिगमीच्या या वैशिष्ट्यामुळेच रंजकतेच्या पलिकडे जात या कलेच्या माध्यमातून मुलांचा कल्पनाविकास करणे सहजशक्य आहे,’’ असे पत्की यांनी सांगितले.

आज चित्र काढण्याचा तास…

शाब्दिक आणि भाषिक संवादापलिकडे चित्रांच्या माध्यमांतूनही मुले संवाद साधत असतात.अगदी लहानपणापासून रेघोट्यांच्या माध्यमातून सुरू होणारा चित्रसंवाद मुलांच्या कला आकलनासाठी महत्वाचा. मुलांचे चित्रकलेशी नाते दृढ कसे करता येईल, हे चित्रकार निलेश जाधव यांच्याकडून आज समजून घेता येणार आहे. ‘लोकसत्ता’च्या मुख्य अंकाबरोबरच ‘चतुरंग’, ‘लोकरंग’ या पुरवण्यांमध्ये आपल्या सुंदर चित्रांनी आशय अधिक बोलका करणारे निलेश जाधव मुलांसाठी चित्रकलेचे सत्र घेणार आहेत. रंग रेषा आणि आकृत्यांशी कशी मैत्री करावी हे या चित्रकलेच्या तासात मुलांना जाणून घेता येईल.

युट्युबवरूनही… ज्या वाचकांना या कार्यक्रमात झूमवरून सहभागी होता येत नसेल, त्यांना ‘लोकसत्ता’च्या युट्युब पेजवर सायंकाळी ४ वाजल्यापासून हा कार्यक्रम पाहता येईल.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Remarks by shriram patki in the mid vacation madhli sutti session akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या