रिपब्लिकन पक्षाचे चीनविरोधी आंदोलन

चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

संग्रहित छायाचित्र

चीनच्या कुरापतीच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शनिवारी राज्यात आंदोलन करण्यात आले. मुंबईत वांद्रे येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. चीन ने लडाख येथील गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर हल्ला केला. त्या हल्लय़ाचा प्रतिकार  भारतीय सैनिकांनी  केला त्यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्या शूर वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून  रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर धोकेबाज राष्ट्र म्हणून चीनच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली. चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही आठवले यांनी या वेळी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Republican party anti china movement abn

ताज्या बातम्या