रामदास आठवले मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार

वांद्रे पूर्व येथे असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये मुंबई लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यात आला

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून रामदास आठवले निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दिली आहे. एएनआयने या संदर्भातले ट्विट केले आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत.

 

Republican Party of India(RPI) has announced that party chief and Union Minister Ramdas Athawale will contest Lokasabha Elections in 2019, from Mumbai South Central constituency. The sitting MP from this constituency is Shiv Sena’s Rahul Shewale pic.twitter.com/q8NDQnNgkp

— ANI (@ANI) July 31, 2018

वांद्रे पूर्व येथे असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये मुंबई लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर रामदास आठवलेंनी दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचेही आदेश दिले आहेत. रिपब्लिक पक्षाच्या ६१ व्या स्थापना दिवसानिमित्त ३ ऑक्टोबरला ठाण्यात महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याच्या पूर्व तयारी संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. त्यात रिपाइंचे मुंबईतील सगळे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Republican party of indiarpi has announced that party chief and union minister ramdas athawale will contest lokasabha elections in 2019 from mumbai south central constituency