scorecardresearch

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! करोना रूग्ण घटल्याने रात्रीची संचारबंदी हटवली, काय सुरू काय बंद? वाचा…

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आलेत.

bmc commissioner on lockdown in mumbai
ओमायक्रॉनला फक्त फ्लू समजू नका, लसीकरण करून घ्या, असा सल्ला पालिका आयुक्तांनी दिला आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. यानुसार आता मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना आता काहिसा दिलासा मिळाला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे.

मुंबईत काय सुरू होणार?

नव्या निर्णयानुसार खालील गोष्टी क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत.

१. समुद्र किनारे
२. गार्डन
३. पार्क
४. जलतरण तलाव
५. वॉटर पार्क
६. थिम पार्क
७. हॉटेल
८. रेस्टॉरंट

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : रेल्वे मेगाब्लॉक – अपरिहार्यता आणि आव्हाने

एकूणच मुंबईतील नाईट लाईफ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. असं असलं तरी अजूनही काही निर्बंध कायम आहेत. या निर्बंधांचा पुन्हा एकदा फेब्रुवारीत आढावा घेतला जाईल. तसेच त्यावेळी असलेल्या करोना संसर्गाच्या स्थितीनुसार निर्बंधांची घोषणा केली जाईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Restrictions in mumbai relaxed amid decreasing corona infection pbs