राज्य व्यावसायिक नाटय़स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

२७व्या राज्य व्यावसायिक नाटय़स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या फेरीतून अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड करण्यात आली आहे.

२७व्या राज्य व्यावसायिक नाटय़स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या फेरीतून अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड करण्यात आली आहे. २ ते ९ मे या कालावधीत बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात अंतिम फेरीतील नाटके सादर होणार आहेत.
प्राथमिक फेरीत २३ नाटय़संस्थांनी प्रयोग सादर केले. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या नाटकांमध्ये जस्ट हलकं फुलकं, वाडा चिरेबंदी, गोष्ट तशी गमतीची, समुद्र, कळत नकळत, त्या तिघांची गोष्ट, ढॅण्टढॅण, रानभूल, वाऱ्यावरची वरात, सर्किट हाऊस यांचा समावेश आहे.प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, नीना राऊत, सुषमा देशपांडे यांनी काम पाहिले.
* दहा नाटकांची अंतिम      फेरीसाठी निवड
* २ ते ९ मे कालावधीत     अंतिम फेरी होणार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Results declared for the primary round of state professional drama competition

ताज्या बातम्या