जातीय अत्याचार रोखण्यासाठी दलित पँथरचे पुनरुज्जीवन ; रामदास आठवले यांचा पुढाकार

१९८९-९० च्या दरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी भारतीय दलित पँथर ही संघटनाही बरखास्त करावी लागली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : देशातील वाढत्या जातीय अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी दलित पँथर या लढाऊ संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली. 

साधारणत: सत्तरच्या दशकात देशात व महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार वाढल्यानंतर दलित साहित्यिकांनी एकत्र येऊन ९ जुलै १९७२ रोजी दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना के ली.  गावागावात संघटनेच्या छावण्या उभारल्या गेल्या. मात्र काही वर्षांतच राजा ढाले यांनी दलित पँथर संघटना बरखास्त के ली, परंतु भारतीय दलित पँथर नावाने पुन्हा आम्ही ती संघटना कार्यरत ठेवली, असे आठवले यांनी सांगितले.

१९८९-९० च्या दरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी भारतीय दलित पँथर ही संघटनाही बरखास्त करावी लागली. पुढील वर्षी ९ जुलै २०२२ रोजी दलित पँथरच्या स्थापनेला ५० वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना करावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार या संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली. दलित पँथर कु णावर अन्याय करणार नाही, परंतु अन्यायाचा प्रतिकार करून पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील, असे त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन ऐक्याबद्दल निराशा

रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र यावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहे, परंतु प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ऐक्य होत नाही, असा निराशेचा सूर रामदास आठवले यांनी लावला. रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपली तयारी आहे, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Revival of dalit panther to prevent communal atrocities ramdas athawale zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या