मुंबई : मराठीत अभिनेता रितेश देशमुखने पहिल्यांदा दिग्दर्शित केलेल्या आणि जेनिलिया देशमुखचे मराठी पदार्पण असलेल्या ‘वेड’ या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. ‘वेड’चे यश आणि मनोरंजन कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रितेशला आपला मित्र दिग्दर्शक निशिकांत कामतची आठवण आली आणि काही क्षणांसाठी तो भावूक जाला. आज निशिकांत असता तर ‘वेड’चे दिग्दर्शन त्यानेच केले असते, असेही रितेशने यावेळी सांगितले.

हेही वाचा >>> रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी ‘वेड’ पाहिल्यानंतर विचारला एकच प्रश्न, अभिनेत्री म्हणते, “त्याक्षणी त्यांना दुःख झालं कारण…”

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘लय भारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामतने केले होते आणि हा रितेशचा पहिला मराठी चित्रपट होता. ‘लय भारी’ या चित्रपटाआधी मी आणि निशिकांतने एकत्र एका चित्रपटासाठी काम केले होते. तो चित्रपट काही आला नाही, पण आमची मैत्री घट्ट होत गेली. ‘वेड’ चित्रपट करायचा हे माझ्या डोक्यात होते, पण त्याचे दिग्दर्शन मी करेन असे ठरले नव्हते. त्यामुळे जर आज निशिकांत असता तर ‘वेड’च्या पोस्टरवर दिग्दर्शक म्हणून त्याचेच नाव झळकले असते, असे रितेशने सांगितले.

हेही वाचा >>> “मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

जेनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा पहिला मराठी चित्रपट असून यात तिने सोज्वळ, सालस अशा मराठी तरुणीची भूमिका साकारली आहे. अत्यंत सामान्य मुलीची भूमिका साकारायची इच्छा खूप आधीपासून होती. आणि ‘फोर्स’ या हिंदी चित्रपटात मला निशिकांत कामतने ती संधी दिली. त्यावेळी मला अभिनयाचे धडे निशिकांतने दिले होते आणि आजही मला त्याचा ‘वेड’मधील श्रावणी साकारताना उपयोग झाला, अशी आठवण जेनेलियाने सांगितली. 

‘वेड’ या चित्रपटाने प्रदर्शनापासून चार दिवसांतच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. ‘वेड’ने आतापर्यंत तिकीटबारीवर १३ कोटींहून अधिक कमाई केली असून मराठी चित्रपटांसाठी नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होते आहे.