मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलवसुली बंद केल्याचा निर्णय ताजा असतानाच मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’वरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्याने टोलमुक्तीचा फटका ‘अटल सेतू’ला बसल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. ॲाक्टोबर महिन्यात अटल सेतूवरुन सात लाख सात हजार १०४ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद झाली. ही संख्या नोव्हेंबर महिन्यात सहा लाख ६९ हजार ९२ पर्यत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोलमाफी हे कारण यामागे असू शकते का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात अटल सेतूवरुन हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक घटली आहे.

मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – न्हावाशेवा असा २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर जेमतेम १२ ते १५ मिनिटांत कापणे यामुळे शक्य झाले. नवी मुंबईच्या दक्षिणेकडील उलवे, उरण, द्रोणागिरी, जासई, पनवेल, गव्हाण यासारख्या उपनगरांमधील रहिवाशांसाठी मुंबई या सेतूमुळे जवळ आल्याने येथील प्रवासी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अटल सेतूला मिळेल असे दावेही केले जात होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा सेतू सुरु करताना एका बाजूस प्रवासासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि नियमित कामानिमित्त मुंबईत येजा करणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. तशा प्रतिक्रियाही या उपनगरांमध्ये उमटल्या. असे असले तरी पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू सोयीचा ठरल्याचे चित्र आहे. असे असले तरी अजूनही नजिकच्या महिन्यांमध्ये या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दहा लाखांच्या पलिकडे पोहोचलेली नाही. राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेताच अटल सेतूवरील प्रवाशी वाहनांची संख्या आणखी कमी झाली असून यामध्ये हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.

Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
cr start work of widening the pedestrian bridge at Diva railway station
दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
thane accident on old Kasara Ghat on Mumbai Nashik highway containers overturned
जुन्या कसारा घाटात अपघात, वाहनांच्या रांगा
hyundai creta electric features specifications and price in marathi
TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
Akola Municipal Corporation privatization tax collection
करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…
MMRDA plans 55 km sea bridge between Uttan Bhayander and Virar
उत्तन-विरार सागरी सेतू, १५ दिवसांत सविस्तर आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी

हेही वाचा – आसनगाव-कसारा लोकल फेऱ्यांमध्ये एक्सप्रेसचा अडथळा, लोकल गाड्या उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी

अटल सेतूला प्रतिसाद कमीच

अटल सेतूला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सुरुवातीपासून एमएमआरडीएला होती. दिवसाला ७० हजार वाहने अटल सेतूवरुन धावतील असे अपेक्षित धरण्यात आले होते. प्रत्यक्षात गेल्या ११ महिन्यांचा हिशोब पाहिला तर अजूनही हे चित्र प्रत्यक्षात आलेले नाही. मुंबईतील पाच प्रवेशद्वारावरील पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना, एसटी बसला आणि शाळेच्या बसला ऑक्टोबर महिन्यात पथकर माफी देण्यात आली आहे. ही पथकर माफी ताजी असताना अटल सेतूवरील वाहनसंख्या आणखी घटल्याने या घटनांचा एकमेकांशी संबंध जोडला जात आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यांपैकी वाशी येथील ठाणे खाडी पूलावरील पथकर नाका हा अटल सेतूस जवळ आहे. अटल सेतूवरील मोठ्या रकमेचा टोल भरण्यापेक्षा जुना वाशी खाडी पूल बरा असे म्हणत शेकडोंच्या संख्येने वाहन चालक या मार्गाने प्रवास करत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांमधून पुढे येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान अटल सेतूवरुन एकूण ७२ लाख ३१ हजार ५५९ वाहनांनी प्रवास केला आहे. सप्टेंबर महिन्यातील एकूण वाहनसंख्या ७ लाख १४ हजार २१३ अशी होती. तर ऑक्टोबर महिन्यात यात काहीशी घट होऊन ही संख्या ७ लाख ७ हजार १०४ वर आली. नोव्हेंबरमध्ये यात आणखी घट झाली आहे. नोव्हेंबमध्ये अटल सेतूवरुन ६ लाख ६९ हजार ०९२ वाहनांनी प्रवास केला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाहनसंख्येत ७१०९ ने घट झाली. तर नोव्हेंबरमध्ये वाहनसंख्येत थेट ३८ हजार १२ ने घट झाली आहे.

अटल सेतूवरुन अतिवेगवान प्रवास करण्यासाठी हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी २५० रुपये, परतीच्या प्रवासासाठी ३७५ रुपये पथकर मोजावा लागतो. मुंबई ते नवी मुंबई प्रवास ठाणे खाडी पुलावरुन पथकर मुक्त झाला आहे. यामुळे वाशी नाक्यावरील कोंडीही कमी झाली आहे. दररोजचा मोठा खर्च करण्यापेक्षा वाशीचा काही मिनिटांचा वळसा फारकाही कठीण नाही. त्यामुळे पुण्याहून येतानाही आम्ही हल्ली वाशीनाक्यावरुन मुंबईत प्रवेश करतो. – पंकज माने, प्रवाशी

हेही वाचा – डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा, दहा दिवसांत इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश

अटल सेतूसारखे मोठे प्रकल्प देशासाठी अभिमानाचे असले तरी स्थानिक रहिवाशांना ते उपयोगाचे ठरतील अशापद्धतीची आखणी सरकारने करायला हवी. उलवा, उरण, द्रोणागिरी, पनवेल, बेलापूरमधील किती रहिवाशी प्रवाशी महागड्या अटल सेतूचा वापर करतात याचे एक सर्वेक्षण सरकारने करावे. अधिकाधिक संख्येने एनएमएमटी तसेच बेस्टच्या बसगाड्या येथून सुरु करा. म्हणजे सेतूचा वापर तरी होईल. – निमीष पिंगळे, रहिवाशी बेलापूर

अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनांची संख्या

१. सप्टेंबर– ६,६०,६७८
२. ऑक्टोबर- ६,३७,०२४
३. नोव्हेंबर – ६,०४,४९७

Story img Loader