राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेवर रस्त्याच्या कामांमधील कंत्राटांमध्ये ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना संधी देण्यासाठी अटींमध्ये फेरफार केल्याचा आरोप केलाय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रशासन आणि महानगरपालिका काळ्या यादीत कंत्राटदारांसोबत करार असणाऱ्यांनाच कंत्राट देणार असल्याची अट घालून पैसे गोळा करण्याचं काम करत असल्याचा आरोप केलाय. शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे असल्याचे हे असले उद्योग केले जात असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आता पुन्हा दोन हजार कोटींची काम देत आहेत. २०१६ ला काही ठेकेदार होते त्यांना ब्लॅक लिस्ट केलं होतं, २०१६ नंतर एक नियोजित टेंडर प्रणाली सुरू झाली. आता अनेक ठेकेदाराना टेंडर मध्ये सहभागी होता येत. १२०० कोटींचं टेंडर आता पालिका पुन्हा काढत आहे. मास्टिक प्लॅण्टसोबत त्याच एमओयु असेल तर आता काम देणार असं पालिका म्हणत आहे,” असं देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.

“मास्टिक प्लॅण्टसोबत कररार असला तरच कंत्राट देणार अशी अट घालण्यात आलीय. हे मास्टिक प्लॅण्ट जे कंत्राटदार काळ्या यादीत होते त्यांचेच आहेत. मग आता हे लोक टेंडर भरणार असं केलं जातं आहे. मुंबई महापालिकेने ब्लॅक लिस्ट ठेकेदार ना काम मिळावं म्हणून प्रशासन आणि शिवसेना षडयंत्र रचत आहेत. शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे आहेत म्हणून ब्लॅक लिस्ट ठेकेदार यांना आत घेण्यासाठी पालिकेने टेंडर प्रकियेत बदल केले आहेत,” असा आरोप देशपांडे यांनी केलाय.

तसेच या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेचा रोल काय आहे हे जाहीर करावं. पालिकेतील विरप्पन रस्त्याच्या कामात लुटमार करत आहेत,” असा आरोप मनसेनं केला आहे. “पालिकेत विरप्पन गँग कोण हे सर्वांना माहित आहेत. सेनेच या ब्लॅक लिस्ट ठेकेदारावर कसलं प्रेम आहे हे आता जाहीर करा,” अशी मागणी देशपांडे यांनी केलीय.

मनसेची ही विनंती आहे रस्ते विभागाने कारवाई करावी. नाहीतर नंतर या प्रकरणामध्ये आम्ही काही केलं तर बोलू नका, असं म्हणत देशपांडे यांनी सूचक शब्दात मनसे स्टाइल आंदोलनाचा इशाराही दिलाय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road work tender in mumbai mns says shivsena changed the conditions to allow blacklisted contractors scsg
First published on: 12-10-2021 at 14:49 IST