मुंबई : पालिका प्रशासनातर्फे मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामातील दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा, योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच येत्या ७ जूनपूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य झाले पाहिजेत, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरात ठिकठिकाणी रस्ते बांधणी व दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. बांगर यांनी शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ते दुरुस्ती कामांची पाहणी केली. चेंबूर पूर्व येथील के.बी. गायकवाड नगर, कुर्ला येथील राहुल नगर, घाटकोपर येथील छेडा नगर, पंत नगर जंक्शन, जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्ता जंक्शन आणि घाटकोपर पूर्वस्थित नालंदा नगरमधील रस्त्यांच्या कामांची पाहणी करून त्यांनी आढावा घेतला.

mumbai, SIT, SIT Records Statements,Senior Officials in Ghatkopar Billboard Accident Case Crime Branch, Ghatkopar billboard accident, Qaiser Khalid, police welfare fund, Arshad Khan, Bhavesh Bhinde, Manoj Sanghu, Janhvi Marathe-Sonalkar, Sagar Patil
पोलीस कल्याणाच्या दृष्टीने जाहिरात फलकाला परवानग्या माजी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचा जबाबात दावा
Thane Municipal Commissioner information about the measures to solve the traffic jam
मुख्यमंत्र्यांचे शहर अडकले वाहतूक कोंडीत, पालिका अधिकाऱ्यांना जोरबैठका सुरू
Poor quality of 15 road works in Pimpri Chief Minister Eknath Shinde confession
पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
Citizens of Dombivli West travel on gravel roads Neglect of MMRDA Public Works Department
डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचा खडीच्या रस्त्यांवरून प्रवास; एमएमआरडीए, सार्वजनिक बांंधकाम विभागाचे दुर्लक्ष
cement concrete roads in mumbai testing at iit mumbai and government laboratories
मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची चाचणी अनिवार्य;आयआयटी मुंबई आणि शासकीय प्रयोगशाळेत नमुन्यांची सामर्थ्य चाचणी होणार
mumbai banganga steps damaged marathi news
बाणगंगाच्या पायऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करा, पालिका आयुक्तांच्या सूचना
Ulhasnagar Municipal Corporation, Issues Show Cause Notices Over Attendance Fraud, Employees attendence fraud in Ulhasnagar Municipal Corporation, ulhasnagar news, marathi news, Ulhasnagar Municipal Corporation Issues Notices to employees, Sanitation workers,
उल्हासनगर पालिकेत ‘डमी’ कर्मचारी
Shopkeepers at the Mumbai Agricultural Produce Grain Market display their wares on the road
धान्य बाजारात दुकानदारांचे रस्त्यावर बस्तान

हेही वाचा : थेट प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही, पोलिसांकडेही जाण्याची मुभा नाही; मुंबई विद्यापीठाचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी नियम

पूर्व द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजविण्याबरोबरच पुनर्पृष्ठीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे आढळता कामा नयेत. त्यामुळे दिसेल तो खड्डा तात्काळ बुजवावा, तसेच रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा तात्काळ हटवावा. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्त्यांच्या डागडुजीची कामे वाहतुकीस अडथळा न येता अहोरात्र वेगाने करून ७ जूनपूर्वी पूर्ण झालीच पाहिजे, असे आदेश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा : मुंबई: ब्लाॅक कालावधीत टप्पा वाहतूक

गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही

मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. सध्या सुरू असलेली कामे ७ जूनपूर्वी पूर्ण करावीत. अन्यथा कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल. रस्ते व वाहतूक विभागातील अभियंत्यावर योग्य पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी राहील, असे आदेश बांगर यांनी दिले.