मुंबई : विज्ञान व तंत्रज्ञानातील विविध आविष्कारांची जादूई दुनिया आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’च्या माध्यमातून दरवर्षी अनुभवता येते. यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा मिलाफ करून रोबोद्वारे ‘डीजे कॉन्सर्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. जपानमधील ‘डीजे रोबोट’ प्रथमच भारतीयांच्या भेटीला येणार असून उपस्थित प्रेक्षकांच्या संवेदना व आवड ओळखून विविधांगी गाणी वाजवणार आहे.

आयआयटी मुंबईच्या पवई संकुलातील ओपन एअर थिएटरमध्ये गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून जगातील पहिलीवहिली ‘रोबो डीजे कॉन्सर्ट’ रंगणार आहे. यंदा ‘टेकफेस्ट’ ‘शाश्वत नावीन्यपूर्ण सचेतनता – जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता शाश्वतता पूर्ण करते’ ( The Sustainnovative Sentience – Where AI Meets Sustainability) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रम व स्पर्धा या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाशी निगडित असतील. दरवर्षी टेकफेस्टच्या ‘ईडीएम नाईट’ (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) म्हणजेच ‘डीजे नाइट’ची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी १० हजारांहून अधिक प्रेक्षक हे हजेरी लावून ‘डीजे’च्या तालावर मनसोक्तपणे थिरकतात. यंदा एखाद्या माणसाप्रमाणेच संपूर्ण ‘डीजे’ यंत्रणा एक रोबोट हाताळणार असल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काळानुसार विज्ञान व तंत्रज्ञानासह मनोरंजनविश्वही विकसित होऊन भविष्यात कसे नावीन्यपूर्ण बदल घडतील, याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच हा तांत्रिक चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षक गर्दी करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

vikrant massey rajkumar hirani web sereies debut
राजकुमार हिरानींचा मुलगा ‘या’ वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Permission , robotic parking lot, Mumbadevi,
मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Mahindra new EV project in Chakan print
महिंद्राचा चाकणमध्ये नवीन ईव्ही प्रकल्प
Viral Video Shows Pet Dog Wants To Ride
‘मम्मी प्लिज मला चढू दे…’ जत्रेत राईडमध्ये बसण्यासाठी श्वानाचा हट्ट, मालकिणीने केला ‘असा’ पूर्ण; पाहा Viral Video

हेही वाचा >>>राज्यामध्ये आज राबविणार जंतविरोधी मोहीम, दीड कोटी मुलांना देणार जंतनाशक गोळ्या

अधिक माहितीसाठी…

‘टेकफेस्ट’चे २८ वे पर्व हे १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयआयटी मुंबईच्या पवई संकुलात रंगणार आहे. विविध स्पर्धा व कार्यक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी व सहभागाच्या नावनोंदणीसाठी https:// techfest. org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ‘टेकफेस्ट’ समितीतर्फे करण्यात आले आहे. ‘रोबो डीजे कॉन्सर्ट’मध्ये सहभागी होण्यासाठीही याच संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक असेल. तसेच techfest_ iitbombay या ‘इंस्टाग्राम’ माध्यमावरतीही अधिक माहिती प्राप्त होईल.

Story img Loader