scorecardresearch

“उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर नव्हे, तर ‘या’ ठिकाणी दसरा मेळावा घ्यावा” रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

“उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर नव्हे, तर ‘या’ ठिकाणी दसरा मेळावा घ्यावा” रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
संग्रहित फोटो

मागील काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू झाला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळावी, यासाठी दोन्ही गटाकडून महापालिकेत अर्ज देण्यात आले आहेत. महापालिकेनं अद्याप कोणत्याही गटाला याठिकाणी दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी दिली नाही.

हा वाद सुरू असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना असून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी त्यांनाच मिळाली पाहिजे, असं विधान त्यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यावा, असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे. ते कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खासगी कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

हेही वाचा- “गणपतीनं अमित शाहांना सद्बुद्धी द्यावी” देशातील संपत्ती विकण्यावरून नाना पटोलेंची खोचक टीका, म्हणाले…

दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असून दसरा मेळाव्याची परवानगी त्यांनाच मिळाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा आयोजित करायला हरकत नाही. शिवसेनेतील बहुसंख्य आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे महानगरपालिकेनं एकनाथ शिंदे यांनाच परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rpi chief ramdas athawale on dasara melava shivsena eknath shinde uddhav thackeray bkc shivtirth rno news rmm

ताज्या बातम्या