रिपाइंचा सेना-भाजपकडील राखीव जागांवर दावा

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला ५७ जागा मिळाव्यात अशी मागणी पक्षाने केली आहे. त्यात १८ अनुसूचित जातीसाठी व २ अनुसूचित जमासाठी राखीव असलेल्या जागांचा समावेश आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला ५७ जागा मिळाव्यात अशी मागणी पक्षाने केली आहे. त्यात १८ अनुसूचित जातीसाठी व २ अनुसूचित जमासाठी राखीव असलेल्या जागांचा समावेश आहे. त्यापैकी काही मतदारसंघात शिवसेनेचे तर काही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे रिपाइंची ही मागणी कितपत मान्य होते, हा प्रश्न आहे.
महायुतीमध्ये शिवसेना व भाजप हे प्रमुख दोन पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम या पक्षांचा समावेश आहे. प्रत्यक्ष जागा वाटपाची अजून चर्चा व्हायची असली आहे.  रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत ५७ मतदारसंघांची नावेही निश्चित करण्यात आली. त्यात १८ अनुसूचित जातीसाठी व २ अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत मेहकर, बदनापूर, औरंगाबाद पश्चिम व देवळाली हे चार मतदारसंघ शिवसेनेने जिंकलेले आहेत, तर वाशिम, उदगीर, उमरेड या भाजपने जिंकलेल्या जागा आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rpi climes shiv sena bjp reserve seats

ताज्या बातम्या