मुंबई : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी आरोपींना ४५  लाख रुपये देण्यात आल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) मंगळवारी विशेष न्यायालयात के ला. तसेच हे पैसे आरोपींना कोणी उपलब्ध के ले याचा शोध घ्यायचा आहे, असेही सांगण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेरील सापडलेले स्फोटक प्रकरण आणि हिरेन हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ३० दिवसांच्या मुदतवाढीची मागणी करताना ‘एनआयए’तर्फे हा दावा करण्यात आला. यापूर्वी जून महिन्यातही न्यायालयाने ‘एनआयए’ला आरोपपत्र दाखल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.  मुदतवाढीची मागणी करताना हिरेन याच्या हत्येसाठी आरोपींना ४५ लाख रुपये देण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याचे ‘एनआयए’तर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.