मुंबई : पक्षाबरोबरच महिलांची बाजू आक्रमक मांडणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

भाजपच्या विजया रहाटकर यांच्या राजीनाम्यानंतर गेले दीड वर्षे आयोगाचे अध्यक्षपद रिक्तच होते. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना आयोगाचे अध्यक्षपद रिक्तच असल्याने आघाडी सरकारवर सातत्याने टीका होत होती.

विरोधकांच्या हल्लयाला तितक्याच सडेतोड, आक्रमकपणे तोंड देणाऱ्या, विषयांची मुद्देसूद मांडणी करणाऱ्या अशी रुपाली चाकणकर यांची ओळख. त्यामुळे अल्पावधीतच त्या पक्षात चांगल्याच लोकप्रिय झाल्या. दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला.