बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझेंनी आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली असून यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी तसंच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

दाऊद, शिवसेना ते अँटिलिया! नक्की कोण आहेत सचिन वाझे?

कोर्टाने सचिन वाझेंची याचिका स्वीकारल्यास त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाईल. तसंच पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. यानंतर सचिन वाझेंना खटल्याला सामोरं जावे लागणार नाही. सचिन वाझेंनी सक्तवसुली संचालनायकडेही (ईडी) अशीच विनंती केली होती. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

सचिन वाझेंनी सक्तवसुली संचालनायकडेही (ईडी) अशीच विनंती केली होती. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. फेब्रुवारी महिन्यात सचिन वाझेंनी ईडीचे सहाय्यक संचालक आणि तपास अधिकाऱ्याला पत्र लिहिलं होतं. यामधअये त्यांना आपण माफीसाठी आपल्याकडे असणारी सर्व माहिती उघड करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान यासंबंधी सचिन वाझे किंवा ईडीने विशेष कोर्टात कोणतंही पाऊल उचललेलं नाही.

माफीचा साक्षीदार बनण्याची वाझेंची तयारी; देशमुखांविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात ‘ईडी’कडे अर्ज

सीबीआयने भ्रष्टाचारा प्रकरणात ४ एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. याच प्रकरणात सचिन वाझेंनी बुधवारी कलम ३०६ अंतर्गत आपले वकिल रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे.

सचिन वाझेंनी आपल्या अटकेनंतर सीबीआयने पूर्णपणे तपास केला असून आपण त्यांना तपासात सहकार्य केल्याचं सांगितलं आहे. सचिन वाझेंनी तपास अधिकाऱ्यांना आपण स्वच्छेने कबुली देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. यानंतर, न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदवला असून याला खटल्यादरम्यान पुराव्याचे मूल्य जास्त आहे.

सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी आपल्याकडे असणारी सर्व माहिती, पुरावे देण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.

ईडीला दिलेल्या पत्रातही सचिन वाझेंनी आपण स्वच्छेने कबुली देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी सीबीआय आणि ईडी दोघांनाही आपण अनिल देशमुखांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्तराँना करोना काळात वेळमर्यादेपेक्षा जास्त काळ सुरु ठेवण्यासाठी पैसे गोळा केल्याचं सांगितलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin waze seeks to become approver against anil deshmukh in corruption case sgy
First published on: 26-05-2022 at 11:15 IST