“…तर सचिन वाझे पळून जाईल;” एनआयएने कोर्टात व्यक्त केली भीती

वाझे पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली आहे.

Sachin-Waze-PTI-1

तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला आहे. वाझे हा नजकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली आहे. आज उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटले आहे की सचिन वाझेंवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये.

“जर याचिकाकर्त्या आरोपीला नजरकैद दिली गेली, तर तो न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातून फरार होईल आणि कथितरित्या त्याचे सहकारी असलेल्या संरक्षित साक्षीदार आणि फिर्यादी साक्षीदारांसदर्भात छेडछाड करेल, अशी सर्व शक्यता आहे. या प्रकरणात साक्षीदार कोण आहेत, याचा शोध घेणं वाझेसाठी अवघड नाही. सध्या साक्षीदारांची ओळख आणि पत्ते सुरक्षित आहेत ठेवण्यात आले आहेत. परंतु वाझेंना मुंबई परिसरातील सर्व माहिती असून तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे, त्यामुळे अडचणी येऊ शकतात”, असे एनआयएने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.

दरम्यान, बायपास सर्जरीनंतरच्या काळजीसाठी न्यायालयीन कोठडीतून नजरकैदेत हलवण्यात यावे या मागणीसाठी सचिन वाझे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे शपथपत्र सादर करण्यात आले. सचिन वाझेंनी आपण पूर्णपणे ठिक होईपर्यंत घरी नजरकैदेत ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sachin waze will abscond if house arrest granted says nia to special court hrc

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या