शांता गोखले, कुमार नवाथे यांना अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार; खांडेकर, एलकुंचवार यांच्या पुस्तकांच्या अनुवादाचाही सन्मान

साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी देण्यात येणारे  पुरस्कार यंदा ज्येष्ठ लेखिका शांता गोखले आणि दिवंगत साहित्यिक कुमार नवाथे यांना जाहीर झाले.

Gokhale Navathe
शांता गोखले, कुमार नवाथे यांना अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई : साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी देण्यात येणारे  पुरस्कार यंदा ज्येष्ठ लेखिका शांता गोखले आणि दिवंगत साहित्यिक कुमार नवाथे यांना जाहीर झाले. मराठीतील अनुवादासाठी नवाथे यांना, तर इंग्रजीतील अनुवादासाठी गोखले यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वि. स. खांडेकर, महेश एलकुंचवार यांच्या पुस्तकांच्या अनुवादालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 

नवाथे यांनी अमिताव घोष यांच्या गाजलेल्या ‘सी ऑफ पॉपीज’ या पुस्तकाचा अनुवाद केला होता. पद्मगंधा प्रकाशनाने अनुवादाचे प्रकाशन केले होते. लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र गोखले यांनी इंग्रजीत अनुवादित केले होते. याशिवाय ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या युगांत या नाटकाचा नीता सेन समर्थ यांनी केलेला बंगाली अनुवाद आणि वि. स. खांडेकर यांच्या एका पानाची कहाणी या आत्मचरित्राचा गुरुलिंग कापसे यांनी केलेल्या अनुवादालाही साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.

देशभरातील २२ भाषांमधील अनुवादासाठी अकादमी पुरस्कार जाहीर झाले. पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी अनुवादासाठी अविनाश सप्रे, डॉ. मेधा पानसरे आणि मिलिंद चंपानेरकर यांनी, तर इंग्रजी अनुवादासाठी अरुणवा सिन्हा, डॉ. रक्षंदा जलील, प्रा. एम. श्रीधर यांनी परीक्षण केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sahitya akademi award translation shanta gokhale kumar navathe translation books ysh

Next Story
राजकीय परिस्थितीवर मुंबई पोलिसांच्या विशेष बैठकीचे आयोजन
फोटो गॅलरी