मुंबई : साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी देण्यात येणारे  पुरस्कार यंदा ज्येष्ठ लेखिका शांता गोखले आणि दिवंगत साहित्यिक कुमार नवाथे यांना जाहीर झाले. मराठीतील अनुवादासाठी नवाथे यांना, तर इंग्रजीतील अनुवादासाठी गोखले यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वि. स. खांडेकर, महेश एलकुंचवार यांच्या पुस्तकांच्या अनुवादालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाथे यांनी अमिताव घोष यांच्या गाजलेल्या ‘सी ऑफ पॉपीज’ या पुस्तकाचा अनुवाद केला होता. पद्मगंधा प्रकाशनाने अनुवादाचे प्रकाशन केले होते. लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र गोखले यांनी इंग्रजीत अनुवादित केले होते. याशिवाय ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या युगांत या नाटकाचा नीता सेन समर्थ यांनी केलेला बंगाली अनुवाद आणि वि. स. खांडेकर यांच्या एका पानाची कहाणी या आत्मचरित्राचा गुरुलिंग कापसे यांनी केलेल्या अनुवादालाही साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya akademi award translation shanta gokhale kumar navathe translation books ysh
First published on: 26-06-2022 at 01:14 IST