मुंबई : सहआरोपीने आर्थिक स्थितीत केलेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला करण्याच्या कटात सहभागी झाल्याचा दावा या प्रकरणातील आरोपी विक्कीकुमार गुप्ता याने जामिनाची मागणी करताना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वांद्रे येथील सलमान खान यांच्या निवासस्थानावर १४ एप्रिल रोजी गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेल्या गुप्ता याने जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर त्याच्या अर्जावर मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेऊन त्यावरील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी ठेवली. तसेच, पोलिसांना गुप्ता याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – मुंबई : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास, १४ हजार ४५४ झोपड्यांचेच पुनर्वसन

हेही वाचा – मुंबई : २,३९८ घरांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे, पत्राचाळीत उच्च गटासाठी १००० चौरस फुटांची १३३ घरे, मात्र अत्यल्प गट बाद

प्रकरणातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिश्णोईच्या चारित्र्याचा प्रभाव आपल्यावर होता. विविध व्यासपीठावर त्याची माहिती वाचल्यानंतर आपण त्याच्या विचारसरणीशी जोडले गेलो. अनमोल आणि लॉरेन्स बिश्णोई तसेच या प्रकरणातील अन्य एक फरारी आरोपीपासून प्रभावित होऊन आपण हा गुन्हा करण्यास प्रवृत्त झालो. गुन्हा केल्यानंतर आपल्याला काहीही होणार नाही, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आल्याचा दावाही गुप्ताने जामीन अर्जात केला आहे. सलमानला हानी पोहोचवण्याचा आपाला हेतू नव्हता. तसेच, याप्रकरणातील आरोपी सागरकुमार पाल याने आपल्याला आर्थिक मदत केली होती व पंजाबमधील जालंदर येथे चालकाची नोकरी मिळवून दिली होती. त्याचे ऋण फेडण्यासाठी आपण पाल याला याप्रकरणात मदत करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा गुप्ता याने जामिनाची मागणी करताना केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan house attack case involved in criminal conspiracy to pay debts for financial aid claim accused mumbai print news ssb
Show comments