महाराष्ट्रात ‘मासिक पाळी’ या विषयावर काम करणाऱ्या समाजबंध संस्थेला शनिवारी (२० ऑगस्ट) अमर हिंद मंडळाचा नामांकित ‘अमर ऊर्जा पुरस्कार’ देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ५०,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कलादालनाचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पु. ल. देशपांडे कलादालन, दादर येथे हा सोहळा पार पडला. २०१६ पासून मासिक पाळीवर केलेल्या समाजबंधच्या प्रबोधनात्मक कामाची दखल घेत विविध पातळ्यांवर पडताळणी करून या पुरस्कारासाठी समाजबंधची निवड करण्यात आली.

मासिक पाळीविषयी जनजागृती करणे, कापडी आशा पॅड तयार करणे आणि ते बनवण्याचं प्रशिक्षण देणे अशा तीन पातळ्यांवर महाराष्ट्राच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात समाजबंध काम करते. यावेळी अमर हिंद मंडळाचे सचिव रवींद्र ढवळे यांनी मंडळाविषयी माहिती दिली. सीमा कोल्हटकर यांनी मानपत्र वाचून दाखवले. तसेच संस्थेच्या कामाविषयी मंडळाने बनवलेली चित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली.

Maharashtra, ST Staff Congress, Practice Camp, Employee Promotion Exam, msrtc, ST Corporation,
एसटी महामंडळात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा….
sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
MLA Abhimanyu Pawar request to Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding contract recruitment in MPSC Pune
एमपीएससीत कंत्राटी भरती नको…; भाजपच्या कोणत्या आमदाराने केली मागणी?
Sharad Pawar was given a clear speech by the Collector Office on the invitation of Namo Maha Rozgar Melava
… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती

भामरागड येथील आरोग्य सखींना हा पुरस्कार व रक्कम अर्पण

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते व समाजबंधचे समन्वयक सचिन आशा सुभाष म्हणाले, “समाजबंधने मासिक पाळीच्या विषयावर भामरागड, गडचिरोली या भागात सत्याचे प्रयोग शिबीर घेतले. त्याच भामरागडमधील १७ गावात समाजबंधच्या कामाला प्रतिसाद देत मोठ्या धाडसाने आणि स्वयंप्रेरणेने हे काम पुढे नेत असलेल्या आरोग्य सखींना हा पुरस्कार अर्पण करत आहोत.”

“पुरस्कारात मिळालेल्या रकमेतून आरोग्य सखींना प्रोत्साहनपर मानधन सुरू करण्यात येईल,” असंही सचिन यांनी यावेळी कृतज्ञतापूर्वक जाहीर केलं.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष रोकडे म्हणाले, “शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना सत्यात उतरविण्यात सामाजिक संस्थांचे मोलाचे योगदान आहे.” मंडळाचे अध्यक्ष भास्कर सावंत म्हणाले की, या पुरस्कारासाठी संस्थांची निवड करत असताना संस्थांचे वेगवेगळ्या विषयातील काम जाणून घेताना आम्हालाही ऊर्जा मिळाली. असे यानिमित्ताने ऊर्जेचे, विचारांचे आदानप्रदान होत राहणे फार गरजेचे आहे. अरुण देशपांडे, दीपक साडविलकर, इतर कार्यकर्ते व हितचिंतकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

समाजबंध सोबतच आदिवासी सहज शिक्षण परिवार- पालघर, हेल्पिंग हँड्स (Helping Hands), कल्याण आणि अहिल्या महिला मंडळ (पेण) अशा चार संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर गाणी आणि नृत्य यांचे सादरीकरण केले.