समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात दाखल केला मानहानीचा दावा

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Sameer-Wankhede-father-first-reaction-to-Nawab-Malik-allegations-2
(संग्रहित छायाचित्र)

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचे आरोप-प्रत्यारोप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक धक्कादायक आरोप केलेत. समीर वनखेडे दलित नसून मुस्लीम असल्याचं म्हणत त्यांनी वानखेडेंचे जात प्रमाणपत्र देखील प्रसिद्ध केले होते. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मलिकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

वानखेडे यांचे वकील अर्शद शेख म्हणाले की, “मलिक यांनी वानखेडे कुटुंबावर फसवणुकीचा आरोप करत त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते हिंदू नसून मुस्लीम असल्याचंही मलिक यांनी म्हटलंय. वानखेडे कुटुंबातील प्रत्येक जण खोटारडा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ज्ञानदेव वानखेडे यांची मुलगी यास्मिन वकील असून ती प्रॅक्टीस करत आहे, ती फौजदारी वकील आहे आणि अंमली पदार्थांच्या प्रकरणांशी तिचा काहीच संबंध नाही, तिच्यावर देखील मलिक आरोप करत आहेत. मलिक यांनी वानखेडे कुटुंबातील सदस्यांचे नाव, चारित्र्य आणि त्यांच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवणारे आरोप केले आहेत,” असं दाखल करण्यात आलेल्या दाव्यात म्हटले आहे.

वानखेडे कुटुंबांतील कोणत्याही सदस्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये काही प्रकाशित करण्यात येऊ नये, त्यांच्याबद्दल लिहिण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhede father dhyandev wankhede filed a defamation suit against nawab malik hrc

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या