मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर रोज नवनवे आरोप करत आहेत. त्यानंतर आता वानखेडे यांच्या वडिलांनी लग्नाबाबत मुलावर होत असलेल्या आरोपांबाबत उघडपणे भाष्य केले आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी, मी दलित आहे, माझे आजोबा, पणजोबा सर्व हिंदू आहेत, मग मुलगा मुस्लिम कसा झाला? असा सवाल केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्या वडीलांनी समोर येऊन याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मी जन्मजात हिंदू असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. माझे पणजोबा सर्व दलित हिंदू होते, मग माझा मुलगा कुठे मुस्लिम झाला? नवाब मलिक यांनी काहीही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा, असे त्यांनी समीर वानखेडेंच्या वडिलांनी म्हटले आहे.
समीर वानखेडेंच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हिंदू असताना त्यांचा मुलगा मुस्लिम कोठून झाला? हे नवाब मलिक यांनी समजून घेतले पाहिजे. नवाब मलिक यांनी असे मागे लागले तर आम्हाला त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करावा लागेल असे ते म्हणाले. नवाब मलिक हे प्रभावशाली व्यक्ती असून ते रावणासारखे असल्याचे सांगितले समीर वानखेडेंच्या वडिलांनी सांगितले. त्यांना १० हात, १० तोंड आणि पैसा आहे. ते काहीही करू शकतो, असे समीर वानखेडेंचे वडील म्हणाले.
याआधीही समीर वानखेडेंच्या वडिलांनी आपले नाव ज्ञानदेव असून दाऊद नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी नवाब मलिक यांनी आणखी एका आरोपात दावा केला आहे की, समीर वानखेडेंनी २००६ साली एका मुस्लिम मुलीशी लग्न केले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेच्या कथित लग्नाचा फोटोही पोस्ट केला आहे. दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता.