Sameer Wankhede CBI Probe : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटींची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा आरोप आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा दिवस होता. शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली.

समीर वानखेडेंनी उच्चारले फक्त दोन शब्द

सीबीआयची आजची चौकशी संपल्यानंतर समीर वानखेडे प्रतिक्रिया देतील अशी आशा माध्यमांना होती. मात्र समीर वानखेडे बाहेर आले. मीडियाने त्यांना प्रश्न विचारले त्यावर सत्यमेव जयते! एवढेच दोन शब्द उच्चारत समीर वानखेडे तिथून निघून गेले.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
Hardik Emotional After Third Defeat
MI vs RR : ‘आम्ही लढत राहू आणि पुढे…’, सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट व्हायरल

समीर वानखेडेंनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. सोमवारी सीबीआय वानखेडे यांच्या चौकशीबाबत कोर्टात आपलं म्हणणं सादर करणार आहे. वानखेडे यांनी चौकशीत सहकार्य करावे असं सांगताना हायकोर्टाने त्यांना २२ मे पर्यंत अटक करू नये असे निर्देश दिले. दोन दिवस झालेल्या चौकशीनंतर सीबीआय उद्या कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आर्यन खान प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्याने समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. २ ऑक्टोबर २०२१ ला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खान गेला होता. याच क्रूझवरून आर्यन खानला समीर वानखेडेंनी अटक केली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या सगळ्यांना त्या कारवाईत अटक झाली होती. आर्यन खानजवळ ड्रग्ज मिळाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आर्यन खानला २५ दिवसांनी जामीन मिळाला होता. आर्यन खानवर कारवाई करणारे अधिकारी म्हणून समीर वानखेडे चर्चेत आले होते.

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्रावीण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो.

कस्टम विभागात आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक आयुक्त म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं. त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय आणि दहशवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या NIA मध्येही त्यांनी काम केलं आहे. ऑगस्ट २०२० मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला होता.