एनसीबीचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या एका आरोपीने खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप केला होता. त्या आरोपीचा जामीन अर्ज आज मुंबईतल्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. या आरोपीवर NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने आरोपी झईद राणा याच्याकडून १.३२ ग्रॅम LSD, २२ ग्रॅम गांजा, एका अज्ञात अंमली पदार्थाची एक गोळी आणि मोठ्या प्रमाणावर भांग जप्त केली होती. या आरोपांनंतर राणाने आपल्या जामिनासाठी अर्ज केला होता. वानखेडे यांनी आपल्या विरोधातले खोटे पुरावे सादर केले आणि त्या आधारावर आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप झईदने आपल्या जामीन अर्जामध्ये केला होता. राणाने आपल्या जामीन अर्जात दावा केला आहे की, राणाचे आई-वडील आणि शेजारी राहणारे वानखेडे यांचे भाडेकरू यांच्यात वैमनस्य असल्याने वानखेडे यांनी आपल्याविरुद्ध बनावट पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे. या वैयक्तिक वैमनस्यातून वानखेडे याने आपल्या घरी कथित वसुली केली, असे राणाने आपल्या याचिकेत नमूद केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede ncb drugs case bail rejected of drugs case accused vsk
First published on: 26-01-2022 at 19:31 IST