सध्या राज्यात मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरण व आर्यन खान वरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यामध्ये एकीकडे आर्यन खान तर दुसरीकडे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे केंद्रस्थानी आहेत. दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज समोर आलेल्या एका व्हिडिओन खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप केपी गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल यांने केला आहे. तर, “ मला ड्रग्ज प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न” होत असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांनी पोलीस आयुक्तांना या संदर्भात पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मला ड्रग्ज प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, हे प्रकरण माझ्या वरीष्ठाकडे आहे. मला तुरुंगात टाकण्याच्या आणि नोकरीमधून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून देण्यात आल्या. हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवलं आहे, त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये.”
केपी गोसावीच्या सहकाऱ्याने केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
केपी गोसावी हा क्रूझवरील छापेमारी प्रकरणातील ९ साक्षीदारांपैकी एक आहे. केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला इंडिया टूडेशी बोलताना केला आहे.