आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर आणखी एक आरोप केला होता. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना त्यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का, असा सवाल केला होता. यासोबत मलिक यांनी कथित पुरावेही शेअर केले होते. त्यानंतर आता हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी नवाब मलिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी मंगळवारी गोरेगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४ड, ५०३ आणि ५०६ आणि महिलांसोबत असभ्य प्रतिनिधित्व कायदा, १९८६ च्या कलम चार अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

“गेल्या काही दिवसांपासून माझे नाव सोशल मीडियावर घेतले जात आहे आणि असा दावा केला जात आहे की मला २०१८ मध्ये तस्करी आणि ड्रग्जचा कथित ताबा या गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली आहे. हे पाहून मला धक्का बसला आहे,” असे हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी म्हटले आहे.

“नवाब मलिक आणि अज्ञात इतरांनी ‘एमव्ही कॉर्डेलिया क्रूझ केस’ मधील आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींविरुद्धचा खटला कमकूवत करण्यासाठी या प्रकरणातील माझ्या बहिणीच्या पतीला गुन्हेगारी रीतीने धमकावण्यासाठी हे केले आहे,” असे हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

नवाब मलिकांच्या आरोपांनंतर क्रांती रेडकरने याबाबत प्रतिक्रिया दिली होती. “मला माहित आहे की नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न आहेत. मला सांगायचे आहे की या प्रकरणात माझी बहीण पीडित आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या मते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. माझी बहीण मलिक यांच्या ट्विटला कायदेशीररित्या उत्तर देणार आहे. समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे क्रांती रेडकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

यासंदर्भात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनीही प्रत्युत्तर दिले होते. “अशा प्रकरणात एका महिलेचे नाव लोकांसमोर प्रसारित करून खूप चांगले काम केलेस मित्रा. खरं तर, आम्ही जेव्हा प्रेस रिलीझ जारी करतो, तेव्हा आम्ही महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांची नावे देखील शेअर करत नाही,” असं समीर वानखडे म्हणाले. तसेच “क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरची केस ही २००८ सालची आहे. त्यावेळी मी नोकरीतही नव्हतो. तसंच क्रांतीशी माझं लग्न २०१७ साली झालं. मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल?” असा सवाल वानखेडे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, वानखेडे कुटुंबीयांनी मंगळवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार केली. क्रांती रेडकरने ज्ञानदेव वानखेडे आणि मेहुणी यास्मिन वानखेडे यांच्यासह राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. “मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आमच्यावर सातत्याने हल्ले होत असल्याची तक्रार आम्ही दिली आहे. या हल्ल्यांमुळे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे,” असे क्रांती रेडकर म्हणाली.