मुंबई: आर्यन खान अमलीपदार्थ प्रकरणानंतर चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला आहे. याबाबत शुक्रवारी देण्यात आलेल्या आदेशात समीर वानखेडे व त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.  त्रिसदस्यीय समितीने १२ ऑगस्ट २०२२ ला याप्रकरणी अंतिम आदेश जारी केला असून त्या आदेशात वानखेडे हे जन्माने मुस्लीम नाहीत. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून विधीवत पद्धतीनुसार इस्लाम धर्म स्वीकारल्याचे सिद्ध होत नाही. वानखेडे आणि त्यांचे पालक हे हिंदू धर्मातील अनुसूचित जातीचे असल्याचे आढळून आले आहे, असे नमूद केले आहे.  माजी मंत्री  नवाब मलिक तसेच मनोज संसारे, अशोक कांबळे, संजय कांबळे या तक्रारदारांनी वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवला होता.

loksatta explained article, navneet rana, relief in caste certificate case, Supreme Court
विश्लेषण : जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा कसा मिळाला? सर्वोच्च न्यायालयाने काय कारण दिले?
High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…
Kejriwal Arrest Case
केजरीवाल अटक प्रकरण : ‘आप’च्या निवडणूक प्रचारासाठी मुंबईतील हवाला ऑपरेटरमार्फत पैसे पाठवले – ईडी
41 firms facing probe donated Rs 2471 cr to BJP
४१ कंपन्यांकडून भाजपला २,४७१ कोटी; सामाजिक कार्यकर्त्यांचा सर्वोच्च न्यायालयात दावा